पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ प्रजेने राजाच्या आज्ञा मान्य करणे व त्या प्रमाणे वर्तणे म णजे स्वतांच्या रक्षणाच्या कामांत हरकत न करणे. ३ प्रजेने राजाला योग्य कर देण्यांत जुलम समजू नाही, कारण त्याच्या बदल्यांत राजापासून सरंक्षण विकत घेते. ४ प्रजेनें राजाच्या विरुद्ध प्रयत्न करणे ह्मणजे आपल्यावर जास्त कर किंवा संकठ ओढून घेणे होय. ५ प्रजेने राजाशी एक निष्टेने असावे की राज्य मजबूत झाल्याने प्रजेला आपली स्थिति सुधारण्यांत उत्तेजन व वेळ मिळेल. ६ प्रजेने आपआपसांत एक विचाराने चालावें की राजाला मध्ये पाडण्याचा त्रास पडणार नाही. ७ प्रजेने नाना व्यापार उद्योगकरोंव किं स्वतःचे पोषण करून राजाला कर देण्यास जडपडणार नाही. ८ प्रजेने राजाचा अभिमान धरावा की त्याला विश्वास राहील. ९ प्रजेने राजाच्या अन्याया बद्दल उताविळ न होतां त्याच्या जवळूनच चालेल तो पर्यंत सुधारा करवावा की शांतता कायम राहील. १० प्रजेने स्वराज्याच्या जुलमानें त्रासून एकाएकी विचार न करि - तां दुसन्या राजाचा आश्रय मागण्यास जाऊं नये किं विकत दास्यत्व घेतल्यासारखे होईल.