पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७७ नृपधर्म. १ राजा ह्मणजे दर्जन अधर्मी मदान्मत्ते इत्यादि दुष्ट जनांचा नाश करून किंवा त्यांच्या वृद्धिची सदर्तनाकडे प्रवृत्ति करून त्यांच्या पासून अनाथ वृद्ध अशक्त सज्जन उदमी वगैरेचे रक्षण करून आपले धर्म बजावितो अर्थात काम अर्थ मोक्ष धर्म ह्याच्या ठायी प्रकाशमान होतो. राजानें प्रजापालकाच्या कामांत दक्षता ठेवावी की आपल्या गाफील पणाचा लाभ लुच्चे मनुष्य न पावतील. ३ राजाने दर्जनांशी निर्दयपणाने वागावे की त्यांना दहशत राहील. ४ राजाने सत्यावर प्रीती ठेवावी की खुशामति बडेजाव शहांनी तो वेष्टित न होईल. ५ राजाने न्यायांत निस्पृहता ठेवावी ह्मणजे प्रजाजनांचा विश्वास निरंतर वृद्धिंगत होत जाईल. ६ राजानें उदार मन ठेवावें ह्मणजे सर्व प्रजाजन संतोषांत निम ग्न राहतील. ७ राजाने रणांत शौर्यता ठेवावी की स्वपक्षाच्या लोकांना धैर्य येऊन ते स्वामी कार्यार्थ आपल्या जिवाकडे न पहातां शत्रचा पराभव करतील व स्वीमिभक्तीचा बाणा नित्यशः मनांत वाळगतील. ८ राजाने दुःखितावर दया करावी की त्यांचे दुःख निवारण झा