पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाळांवर प्रीति ठेवावी, ह्मणजे त्यांना आपल्याविषयी आनंद होईल व आपणास वाखाणतील. सासुसासरे ह्यांच्याशी नम्र व मर्यादपणाचें वर्तन ठेवावें की त्यांना आपल्या विषयी आनंद होईल. मेहणामेहुणी ह्यांच्याशीही त्यांचे मन न दुखवेल असे वर्तन ठेवावे. कारण उगाच अहंपणाने राहून आपल्या मनास कोंडून ठेवण्यांत काय अर्थ आहे? र आप्तवर्ग ह्यांच्याशीही मिलनसार पणाचे वर्तन ठेवावें व बनेल तोपर्यंत त्यांना संतोष होईल असे करावें. । चाकर माणसाशी गोडी गुलाबीने कामा पुरते बोलवे व चोख वर्तन ठेवावें, त्यांच्या दुखण्याच्या व उदासीनतेच्या वेळेस त्यांना संतोष होईल असें वर्तावें, व त्यांच्या कामाची बूज व सोय जाणावी, त्यांना हलकट व नीच शहांनी बो. लावू नये किंवा शिव्या देऊ नये. असे केल्याने एकतर प्रामाणिक होतात आंग मोडून मेहनत करितात व आपणावर खूष असतात. १० सावकाराशी प्रामाणिक चोख व व्यवस्थेशीरपणाने वीवें व आपली प्राप्ति पाहून काम करावे किं आपला व्यवहार कायम राहील व आपण अडचणीत येऊन आपणास दुःख व पश्चात्ताप होणार नाही.