पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होतात ह्यामुळे आपणासही दुःख होते. आज्ञाधारकपणा न ठेविला तर त्यांनां अपमान वाटतो, व त्यांची आज्ञा आपल्याच हिताची असते ह्यामुळे आपणच आपले अहित करून घेतल्या सारखे होते. बहीणभाऊ ह्यांच्याशी सरळ. चोख निष्कपट मायचे वर्तन ठेवावें, व कलह न करितां आनंदांत रहावें. ह्यांच्याशी सरळपणाने न वागलो तर धुसपुस हमेश होत जाते व त्यांतून एकमेकांविषयी तिटकारा उत्पन्न होतो व ह्यामुळे ते व आपण दोघेही आनंदापासून मुकतो. चोख वर्तन न ठेविलें तर एकमेकांच्या मनांत परस्परांविषयी संशय उत्पन्न होऊन शुद्ध परस्पर प्रीतीचे में सुख त्यांत दांभिकपणाचा प्रवेश होऊन त्याला [ सुखाला] कीड लागते, व निष्कपटमाया [अर्थ किंवा मतलबाशिवायची प्रीति किंवा शुभेच्छुकपणा ] ही न ठेविली तर परस्पर लज्जास्तव व वरवर प्रीति दाखविण्यांत येते. ह्यामुळे आपण व ते दोघेही खऱ्या प्रीतीच्या सुखापासून मुकतो, व ह्याला आपले वर्तन कारण असल्यामुळे आपणास विशेष बाईट वाटते. काका, मामा, ह्यांच्याशी नम्र व मर्यादपणाने वर्तावें, व त्यांच्याविषयी शुभेच्छुकपणा ठेवावा की त्यांना आपल्याविषयी संतोष राहून त्यांच्या मनांत प्रीति कायम राहील. काकी, मामी, मावशी, आत्या ह्यांच्याशी मर्यादपणाने वतावें व नम्र बोलावे व शक्तनुसार मदत करावी व त्यांच्या मुला