पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ ११ मनुष्याने बनेल तर सकाळी नाहीतर मायंकाळी स्वच्छ उघड मैदानांत किंवा बागेत व्यायाम करावा की प्रकृति चांगली राहील; ह्या गोष्टीकडे शहरांत रहाणाराने विशेष लक्ष द्यावे. कुटुंबवर्तन. १ कुटुंबांत ह्मणजे आपला व ज्यांचा निकट कामाचा संबंध आहे, व परस्परांच्या हितहिताचे व सुख दुःखाचें परस्परांवर दृढीकरण आहे व ज्यांना मदत करण्याचे आपले व आपणास मदत करण्याचें ज्यांचे कर्तव्य कर्म आहे अशा मनुष्यांत रहाणे असल्यास कशा प्रकारचे वर्तन ठेविले पाहिजे की, त्यापासून उभयतांस सुख व यश प्रात्प होईल. आईबाप ह्यांच्याशी निष्कपट, नम्र व आज्ञाधारक वर्तन ठेवावे. कारण निष्कपटवतन न ठेवलें तर त्यांच्या मनांत आपल्याविषयी संकोच व शोक वाटतो, आणि त्यांचे मन आनंद रहित रहाते, व आपणास ते एक अमोल्य दुर्मिळ व प्रिय वस्तु वाटण्याच्या ठिकाणी त्रास व अडचण कारक बोजा रूप वाटतात .त्यामुळे आपले वर्तन त्यांना अपमान लागेल असें होत जाते. ह्यामुळे ते व आपण दोघेही असखी होतो व आपणाकडे जगाचे हास्य तिरस्कार व अयोग्य वर्तनाचा कलंक हे विशेष येतात. नम्र वर्तन न ठेवले तर त्यांच्या मनाचा संतोष न झाल्याने त्यांच्या बद्दल आपण घेतलेले श्रम व्यर्थ