पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७३ ४ अति जरूरीच्या कामा शिवाय अवेळी ( जेवणाच्या किंवा घर कामाच्या अथवा उन्ह, पाऊस वगैरे असल अशा वेळी) घरांतून गमन करूं नये की मुख्य काम एकीकडे राहील किंवा व्यर्थ आपण श्रम घेतल्या सारखे होईल. अपरात्री संरक्षणाचा उपाय योजिल्याशिवाय आणि अगत्याच्या कामाशिवाय बाहेर उगाच जाऊं नये की हानी अथवा व्यर्थ त्रास मात्र विशेष असे होईल. ६ शत्रच्या गृही योग्य कामाशिवाय व अवेळी आणि एकटे जाऊं नये की आपण होऊन त्याच्या भक्षस्थानी पडूं. देशांतरी जाणे झाल्यास घरची व्यवस्था अगोदर लावावी की घरच्या मनुष्यांना आपल्या पाठीमागे अडचण न येईल. ८ घरांतून बाहेर पडतांना शक्तिप्रमाणे स्वच्छ व चांगले वस्त्र घालावें की आपली अपरिचित मनुष्यापासूनही मान हानी न होईल. आप्तवर्ग व इष्टमित्र ह्यांच्या समाचाराप्त योग्य वेळी जाण्यास हयगय करूं नये की संघट्टण कायम राहील (व्यवहार). १० परगांवीं जातांना चालेल तोपर्यंत भोजन करून जरूर त्या वस्तु बरोबर घेण्याचे विसरूं नये की क्षुधेनें पीडित बहुदा आपण होणार नाही, व जरूर वस्तूंची आपणास हरकतही पडणार नाही.