पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

किंवा वाईट गोष्टी विषयी विचार करूं नये की अन्न अंगी न लागेल. जेवतांना क्रोध किंवा संताप करूं नये किं पित्ताग्नि मडकेल. जेवण फार मंद करूं नये किं आपला वेळ फुकट जा ऊन पंक्तिच्यांनाही खोटी व्हावे लागेल. ' ९ जेवण अति ऊनऊन जेऊं नये किं काळीज व आतड्यांना इजा होईल. १० जेवण फार उतावळीनें जेऊं नये की घास मानेंत अडकेल. ११ जेवण अति मिष्ट नसावे किं वीट येईल. १२ जेवण अति तिखट नसावें की अंगाची आग होईल. १३ जेवणाचे खरोखर सुख ज्याला मेहनतीने श्रम झाले आहेत व पक्व क्षुधा लागली आहे त्याला मात्र प्राप्त होते. गमन. १ गमन ह्मणने स्थान सोडणे अथवा एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, कामाशिवाय कोणाकडे जाऊंनये की आपला वेळ व श्रम फुकट जाऊन आपली प्रतिष्टा कमी होईल. कोणाच्या एकांतांत कारणा शिवाय जाऊं नये की त्याला आपला त्रास होईल.