पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिष्याने गुरूची निंदा करूं नये कारण शिष्याच्या मनाने जो निदेस पात्र आहे, त्याचीच विद्या शिष्याने संपादन केले ली आहे. ८ शिष्याने गुरूचें बनेल तेवढे कल्याण करावें कारण तो त्याचा ऋणी आहे. ९ शिष्याने गुरूवर प्रीति ठेवावी कारण ते त्याचे कल्याण करणारे आहेत. १० शिष्याने गुरूला हलकेपणा येईल असें कर्म करूं नये, की ज्या पासून त्यांनां (गुरूस) दुःख होऊन आपलीही अप्रतिष्टा न होईल. भोजन. भोजन ह्मणजे जीव संरक्षणार्थ व पोषणार्थ अन्न, फळे वगैरे भक्षण करणे. भोजन नियमित वेळी करावें की प्रकृति बिघडणार नाही. ३ भोजन साधे व निर्मळ असावें किं आपणास ते न बाधेल. ४ जड भोजन वारंवार जेऊं नये की अरुचिकर लागेल व पाच न शक्ति कमी होईल. ६ भोजन अहारावर जेऊं नये की अजर्णि होईल. ६ जेवतांना फार बोलूं नये किंवा अपशब्दांचा उच्चार करूं नये