पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० र गुरूने शिष्याला स्वधर्माच्याठायीं स्थैर्यता ठेविण्यास शिकवा वे की त्याचे अंतःकरण शांत राहील. . गरूने शिष्यावर अति कडकपणा ठेऊं नये की तो त्रासन जाईल. १० गुरूने शिष्याशी अतिनम्रपणा ठेऊं नये की त्याच्या मनाची वचक जाईल. शिष्य धर्म. शिष्य ह्मणजे गुरूची सेवा करून व नम्रपणाने वागून कि. द्या संपादन करून, गुरूला यश देऊन आपले ही कल्याण करून घेणारा. शिष्याने गुरूचे आज्ञेत वागावें कारण त्याची आज्ञा शिप्याच्या कल्याणाची असते. शिष्याने गुरूशी नम्रतेने वागावें की त्याच्या आज्ञा पाळ ण्यांत बेपर्वाई होणार नाही. ४ शिप्याने गुरूची सेवा करावी कारण हाच गुरूपासून वि द्या संपादन करून घेण्याचा उत्तम उपाय आहे. ५ शिष्याने गुरूला मान द्यावा कारण तो त्याचा उपकारी आहे. ६ शिष्याने गुरूला त्रास देऊं नये कारण आपणाला विद्या शि कविण्यास त्याला कंटाळा न येईल.