पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शी मनापासून मित्रता जोडू नका, व सोवत करूं नका. दैवयोगाने झालीच तर त्यांच्या गळ्यास मिठी मारूं नका, पण दूर व्हा. गुरुधर्म. गुरु ह्मणजे शिष्याला अयोग्य त्रास न देतां निष्कपटाने विद्या शिकऊन त्याचे कल्याण इच्छिणारा व त्याच्या उत्कर्षा विषयी अभिमान ठेवणारा. गरने शिष्याला मुलाप्रमाणे मानावें की त्याच्या मनांत पूज्य बुद्धि उप्तन्न होईल. ३ गुरूने शिष्याचे कल्याण इच्छावें, की आपले कर्तव्यकर्म पूर्ण होईल. ४ गुरूने शिष्याला निष्कपटानें विद्या शिकवावी की त्याचें कल्याण होईल. ५ गुरूने शिष्याशी मर्यादेने वागावें की तो आपणाशी योग्य रीतीने वर्तेल. गुरूने शिष्याला नीतीने वागण्यास शिकवावें की तो दुर्गुणापासून मुक्त होईल. गुरूने शिष्याला व्यवहारिक ज्ञान शिकवावे की त्याचे आयुष्य सुखांत जाईल. TION