पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ मैत्री जोडण्यास तत्पर असावे कारण त्याने आयुष्य आ नंदात जाते. ३ मित्राशी लबाडी करूं नये. नाहीतर अविश्वास उत्पन्न होईल. ४ मित्र निर्लोभी निष्कपट व सज्जन असवा को सुख होईल. ५ मित्राशी फाजील मस्करी करूं नये, की मित्रता नष्ट होईल. मित्राला सुख होईल असे करावे की प्रीतीत वृद्धि होईल. ७ मित्राच्या विचाराचे मनन करावें की आपण त्याचा लाभ घेऊ शकू. ८ मित्राशी अभिमानाने वागू नये की बेपर्वाई उत्पन्न होईल. ९ मित्राला हलके पाडण्याचा प्रयत्न करूं नये, की तिरस्कार उत्पन्न होईल. १० मित्राला फाजील घस देऊ नये, की त्याला त्रास न होईल. ११ मित्राची निंदा करूं नये की संशयाला जागा न मिळेल. १२ मित्रास योग्य कारणासाठी हळु नम्रतेने व युक्तीने ठपका द्यावा. की, त्याच्या मनांत विपरीत न येतां त्याचा फायदा होईल. मित्रास प्रसंगी वाटेल ते झाले तरी सोडूं नका! व घस घेऊनही साह्य केल्यावांचून राहूं नका, कारण ह्याने प्रीतिधडा दुसऱ्यांस घेतां येईल. टीप. हे सज्जनांच्या मित्रतेत लागू आहे; परंतु (व्यसनीखेळ, गडी,) वाईट चालीचे, परद्वार गमनी,उधळे, कर्जबाजारी, राजद्रोही, चोरटे, निदक, खोटे बोलणारे, हांनीहा करणारे ह्यांच्या