पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आप्तधर्म. आप्त म्हणजे सोयरे, संबंधी, इष्ट, अर्थात परस्पराचे हित व कल्याण करणारे. २ आप्तवर्गाशी नम्रतेने वागावें. ३ आप्त वर्गाच्या संकटाच्या वेळी त्यांनां बनेल तेवढी मद त करावी. ४ आप्तवर्गी, आपल्याच्याने होईल तेवढे कल्याण करावें. आप्तवर्गास आपल्याच्याने बनेल तोपर्यंत संतोषित ठेवावें. ६ आप्तवर्गाविषयी तिरस्कार करूं नये. ७ आप्तवर्गाची निंदा करूं नये. ८ आत्पवर्गाची बेपर्वाई करूं नये. ९ आत्पवर्गीला त्रास होईल असे करूं नये. १० आत्पवर्गाला बुडविण्याची दानत ठेऊ नये. ११ आत्पवीच्या नुकसानीत खूष होऊ नये. ह्या प्रमाणे व तन केल्यास आपण त्यांची प्रीति संपादन करून त्यांच्या पासून मान पावू. मित्रधर्म. १ मित्र म्हणजे आपले हित इच्छिणारा प्रसंगी शक्तिप्रमाणे सहाय्य करणारा व मनास आनंद किंवा करमणूक देणारा.