पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चयी ईश्वराची प्रार्थना करण्यांत व पुनः असे न करण्याविषयी निश्चय करण्यांत, दयावंत परक्याच्या दुःख विमोचनाच्या उपायाचा विचार करण्यांत, सूज्ञ सर्वीच्या सुखाच्या साधनांचा विचार करण्यांत, एकांताचा लाभ घेतात. उलट आळशी मनुष्य कुंभकर्णा सारखे खुशाल निद्रपद भोगण्यांत, कुटिल आपलें दुष्कर्म साधण्याचा विचार करण्यांत, शठ दुसऱ्यांस आपल्या पासून पीडा कोणत्या प्रकारे होईल ह्याचा विचार करण्यांत, स्वतःच्या परिणामाचा विचार न करितां गाफिलीत रहाणारे, चैनीचैनीचे व ऐषआरामाविषयी नानाप्रकारचे तरंग मनांत अणून मग्न रहण्यांत, व निशेमध्ये चकचूर होण्यांत, चुगलखोर व घरफोडे आपला बेत सिद्धीस नेण्याचा विचार करण्यांत, व कोणत्याही कारणाने कुबुद्धीनें ज्याला वेष्टिले आहे असे मनुष्य, कुबुद्धि जो रस्ता दाखवील तीकडे विचार केल्याशिवाय एकदम गमन करण्यांत किंवा तदनुरूप आचरण करण्यांत व ज्याच्या हातून दुष्कर्म झाले आहे असे मनुष्य आपले दुष्कर्म छपविण्या करितां उलट कुकर्म करण्यांत एकांताचा दुरुपयोग करितात. ४ सर्व अपराधांचे मूळ व सर्व अचाट आणि आश्चर्यकारक कार्याची माता एकांत आहे.