पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मनुष्याने कृपणता न करता उपयोगच करावा अशी परमेश्वराची प्रसादरूप वस्तु काळ किंवा वेळ हीच आहे. कारण हिचा जर उपयोग न केला तर ती आपण गमाविली असे होते. कारण ती पुन्हा आपणाला मिळत नाही. तर हिचा ( वेळेचा ) उपयोग करून न घेणे हे आपणाजवळची आपणास अत्योपयोगी अशी वस्तु गमावण्याची इच्छा करण्या बरोबर चातुर्याचे काम [ कृति ] होय. एकांत. १ एकांत ह्मणजे एकाशिवाय दुसरा नाही असे स्थळ अर्थात स्वतःशिवाय दुसऱ्याचा जेथे उपसर्ग नाही असे स्थळ किंवा वेळ. एकांतांत मनुष्याला कोणाचा उपसर्ग किंवा कोणत्याही प्रकारची हरकत नसल्याने त्याचे मन स्थीर असते. उलट एकांतांत मनुष्याला कोणाची मदत किंवा आश्रय अथवा आशा नसल्यामुळे त्याचे मन धास्तीत, खिन्नतेंत व निराशेत असते. दृढ मनुष्य आपले मन स्थीर करण्यांत, बुद्धिमान मनुष्य विचार करण्यांत, उद्योगी काम करण्यांत, ईश्वरभक्त परमेश्वराची भक्ति करण्यांत,निर्मळ व कोमळ अंतकरणाची मनुष्ये आपल्या दुष्ककर्मा बद्दल पश्चात्ताप करून पुनः असें न होऊ देण्यावि