पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होतां, सुविचारास अनुसरून उपयोग केला तर काळ हा प्रभूच्या कृपेचा प्रसादरूप होय. वेळेच्या (स्थितीच्या ) दुर्विकाराच्या स्वाधीन होऊन दूरुपयोग केला अथवा उपयोगच न केला तर दुःख कारक शासन रूप होय. ( काळ) टीका-वेळ व तरवार ही दोन्ही समांन होत कारण सदुपयोग केला तर जशी तरवार आपल्या शत्रूचा नाश करून आपला बचाव. करते. (शत्रूपासून) तद्वत्वेळेचा सदुपयोग केला तर दुर्विकाराचा आपोआप नाश होतो. व त्याच्या ठायीं सद्गुणाचा प्रवेश होऊन पश्चातापरहित आपले आयुष्य आनंदांत, यशांत व सुखांत जाते. कृतिही काळास कारण आहे काळ, व हा कृतीस फळीभूत किंवा निष्फळ करण्यास कारण आहे. काळ हा चमत्कार पाहून आश्चर्यात गर्क होण्याचा ( आनंदात मग्न ) ह्याच्याहून उलट शुद्धीवर येण्याचा व ह्याच्याहून उलट वर्तमान किंवा भावी दुःखात ( मूल्स ) गर्क होण्याचा आरसा होय. टीका.-एक काळी हर्ष, यश, धन, कीर्ति, विद्या, शक्ति हक्क, उदय; प्राप्त होतात, एके काळी दुःख, अपयश, नाश, मूर्खता, निवळता, अस्त प्राप्त होतात; तेव्हां हे बनाव पाहून साधु आश्चर्यात गर्क होउन प्रभूच्या लीलेचा आनंद मानतात व नम्रता गृहण करित जातात. सूज्ञ सावध होऊन दुर्विकारापासून आपणास बचावून घेतात व मूर्ख दुःख करून निरुत्साही होतात किंवा गर्वात फुगन बेफाम होतात.