पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शक्ति असून विनाकारण आळसांत राहून किंवा निष्काळजीत पडून परतंत्राने वागणे ह्मणजे दुसऱ्यावर अवलंबून राहणे हे लज्जास्पद कर्म होय. कारण परक्याच्या ताब्यांत रहाणे हे निर्बळतेचे चिन्ह आहे. ८ परक्याच्या ताब्यांत रहाणे हैं, मान, वित्त, लाभ, ह्याच्या ना शास कारण होय. आपल्या शुभेच्छकाच्या ताब्यांत रहाणे हैं, मान, वित्त, लाभ ह्याच्या वृद्धीस व आपल्या कमअक्कलेमुळे किंवा अक्कलहीन श क्तीमुळे आपला नाश न होतां निभाव लागण्यास कारण होय. १० एकंदरीत आपल्या दुर्बळतेच्या वेळेस दुसऱ्याच्या ताब्यांत राहून वर्तमान काळी आपला निभाव करून घेणे, व भविष्य काळी स्वतः स्वतःचा बोजा उचलण्यास सामर्थ्यवान् होऊन परतंत्रतेच्या भारांतून मुक्त होणे हे शहाणपणाचे चिन्ह होय. काळ-वेळ. १ वेळ, वक्त, स्थिति ह्या तीन शहाच्या अर्थाचा काळ ह्या शब्दांत समावेश होतो; व कृति किंवा कृत्य ह्याच्या अर्थाचा समा वेश स्थिति, वेळ वक्त ह्यांत होतो. टोका–कृति किंवा कृत्याप्रमाणे वेळ येतेवेळेस अनुप्तरून स्थिति होते. २ वेळेच्या ( स्थितीच्या ) शक्तिनुरूप दर्विकाराच्या स्वाधीन न