पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जनांत सर्वांशी नम्र पणाने वागावे आणि मधुर व सत्य बोलावें, कारण त्यापासून आपण सांस प्रिय होतो व आपल्या करणीवर व बोलण्यावर सर्वांचा विश्वास असतो, व आपल्यावर विश्वास असल्याने आपण त्यांचे व आपलें कल्याण करण्यास थोड्या श्रमाने यशस्वी होतो. व आपल्यावर सर्वांची प्रीति असल्याने आपला काळ आनंदात व प्रतिष्टेत जातो. समान परतंत्रता. समान परतंत्रता ह्मणजे आपल्या बरोबरीचा किंवा समान असून त्याच्या ताब्यांत किंवा त्याच्या तंत्राने चालण्याचा प्रंसग आला असतां कशा रीतीचे वर्तन ठेवावें की आपणाला धक्का न बसतां व त्याच्याशी बिघाड न होतां आपण पार पडूं. आपल्या बरोबरीचा असून आपणाला त्याच्या तंत्राने किंवा त्याच्या इच्छेनुरूप वर्तण्यास भाग पडण्याचे कारण त्याच्यापेक्षा आपल्यांत काही तरी कमतरता असली पाहिजे, किंवा त्याच्यापासून आपणाला नुकसान होण्याचा संभव असलापाहिजे, अगर त्याचे सहाय प्राप्त झाल्यास त्यांत आपला काही तरी लाम असला पाहिजे. मतलब, असा प्रंसग आला असता त्याच्या. शी बिघाड न करितां आपले काम साधणे हे शहाण पणाचें होय. ३ आपल्या बरोबरीचा असून त्याच्या तंत्राने वर्तन केल्याने