पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोग्य त्रास त्यांनां न पोचता त्यांच्या मनांत आपल्याविषयी पूज्य बुद्धि कायम राहील; ह्यालाच दुसऱ्या शब्दांत संसाराचे चीज ह्मणतात. जनांत ज्यारीतीने लोकांनी आपणाशी वागावे असे आपण इछितों त्याच रीतीने आपण लोकांशी वागलो तर हटकून अपली इच्छा तडीस जाते. जसे आपण ज्याशी वर्तन करतो तसे त्याच्याविषयी विचार आपल्या मनात येतात. जनांत ह्मणजे संसारांत मुख्या गोष्ट ही की विनााकरण कधीही आपणाकडून कोणाचें मन दुःखविलें जाऊं नये, कारण तसे केल्याने आपले मन आपणाला पुढे खाते किंवा आपणास पश्चात्ताप उप्तन्न होतो व आपणाकडून ज्याचें मन दुःखविले गेले असेल त्याच्या मनांत उदासीनता उप्तन्न होऊन आपल्या विषयी संताप क्रोधही उप्तन्न होतो. एकंदरीत असे केल्याने जगांत जो आनंदाने काळ क्रमण करावयाचा त्याच्याबद्दल्यांत उभय पक्ष, ह्मणजे आपण व ज्याचें मन आपल्याकडून दुःखविले गेले असेल तो, आनंद रहित होऊन दुःखी होतो, व त्याला आपलीच वर्तणूक कारण असल्याने आपल्याकडे विशेष वाटणी असते कारण आपणाला संतोष मानण्यात कोण ताही आधर नसतो. जनांत आपणाच्याने दुसऱ्याच्या जितकें उपयोगी पडवेल तितके पडण्यास आळस करूं नये कारण प्रतिष्टा व कार्ति संपादन होण्यास दुसरामार्ग नाही.