पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकतर त्याच्या पेक्षा आपले वजन कमी होते, दुसरे आपणाला अपमान सहन करावा लागतो, तिसरे आपले वजन कमी झाल्या मुळे त्याच्याशिवाय स्वतंत्रतेने आपण कोणतेही काम करूं शकत नाही; आणि दुर्दैवाने तो दुर्जन असला तर आपणाशी मिजासेनें वागतो व आपला अपमान करण्यास मागे पुढे पहात नाही व मी तुझे कल्याण करणारा किंवा करतो यास्तव तूं माझ्याशी नम्रतेने वागले पाहिजे असा आपल्या मनांत भास होईल असे वर्तन करतो व जर तो चढाऊ असला तर तोंडावर किंवा दृष्टांतर रूपानेही सांगून दाखवितो. एकंदरीत आपल्या फायद्या करितां आपणास येवढा जाच सहन करावा लागतो. आतां आपला लाभ साध्य होऊन आपणास वरचा जाच सहन करावा न लागेल किंवा कमी सहन करावा लागेल असें वर्तन ठेवणे भाग आहे. तर एकतर त्याच्याशी फार बोलू नये, दसरे बनेल तोपर्यंत त्याची इच्छा त्याच्या मुखांतून निघण्याच्या अगोदर तदनुरूप वर्तन करावें; तिसरें त्याच्या पेक्षा आपणांत जी कमतरता असेल, ती भरून काढण्यास प्रयत्न करावा; चवथें मध्यम स्वतंत्रतेने झणजे त्याला आपला अपमान झाला असें न वाटेल असें वर्तन ठेवावे; पांचवें आपणाला त्याच्या पासन जसा लाम आहे तसा त्याला आपल्या पासून लाभ होईल असें बनेल तोपर्यंत करावें, परंतु आपणाला जो लाभ त्याच्या पासून होणार आहे त्याच्याहून अधिक किंवा समान तोटा आपणास होउ नये; सहावें त्याच्यावरच अवलंबून न रहातां पढ़ें सरण्यास शांतपणाने व पूर्ण विचाराने प्रयत्न करावा