पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ [अर्ध दुःख कारक ] हीच परमेश्वराच्या ईच्छेची अवाज्ञा होय. आतां ज्ञान हा बुद्धीस [ परियायाने आपणांस ] हितकर असा रस्ता दाखविणारा मंत्रि आहे. कारण त्याच्या विचाराच्या उलट जी क्रिया होते तिचा परिणाम दुःख कारक होतो, तर ज्ञानाच्या विचाराच्या उलट वर्तन करणे ह्मणजे आपला वाईट परिणाम करून घेण्यास किंवा होण्यास इच्छिणे ह्यालाच दुर्विकाराच्या स्वाधीन होऊन तदनुरूप वर्तन किंवा क्रिया करणे ह्मणतात. सारांश क्रिया, कृति, किंवा काम, व वर्तनही विचार पूर्वक ह्मणजे परिणामाचा विचार करून योग्य वाटेल तसे करावें. कारण आपण चांगली कृति किंवा वर्तन केले तर त्या पासून आपणास सुख होते व त्या सुखास आपलीच कृति कारण असल्यामुळे आपणास आनंद उत्पन्न होतो. उलट आपली कृति वाईट असली तर तिजपासून आपणास दुःख होते व त्याला आपलीच कृति कारण असल्यामुळे दुःखाच्या बरोबर पश्चात्ताप होतो झणजे दुःखावर डाग. जनांत. जनांत ह्मणजे आपल्या समान प्राण्यांत वागणे, असणे, वर्तणे, किंवा कार्य करणे, ते असे की आपल्याविषयी त्यांच्या मनांत हलकट विचार किंवा तिरस्कार उप्तन्न न होतां व आपल्या पासून