पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५७ जशी बुद्धि तशी क्रिया, जशी क्रिया तसा काळ, काळ तशी वेळ आणि वेळ तशी स्थिति आणि स्थिति तशी व्यवस्था आणि व्यवस्था तसे सुख किंवा दुःख व त्याचा परिणाम; यास्तव आपल्या दुःख सुखास कारण आपली क्रियाच होय; आणि क्रियेस बुद्धि कारण आहे व बुद्धीस मनोविकार व मनोविकारास कारण ज्ञान व ज्ञानास कारण संगत किंवा शिक्षण; यास्तव आपल्या सुखदुःखाचे व त्याचा परिणामाचे मूळ वीज संगत किंवा शिक्षण ह्यांत आहे. अर्थ-ज्ञानास, बुद्धीस, क्रिया करण्यास, आपला विचार देण्यास संगत किंवा शिक्षण हा आधार आहे. ह्मणजे संगत ह्याचा अर्थ जवळच्या पदार्थांच्या गुणांचा परिणाम, व शिक्षणाचा अर्थ त्यागुणांच्या परिणामाची माहिती. टीका-प्रसंगानेही ज्ञान माहिती किंवा अनुभव येतो परंतु प्रसंग . ह्मणजे ही संगत होय कारण तो ही प्रत्यक्ष आपणास किंवा आपल्यावर येतो ह्मणजे त्याचीही संगत होते. आतां जशी आपण क्रिया करितो तसे आपणास सुख दुःख व तिच्या परिणामाचा अनुभव येतो, अनुभव येतो ह्मणजे माहिती किंवा ज्ञान होते; आतां माहिती किंवा ज्ञान होते या वरून जो सुखाचा रस्ता असेल तशी क्रिया करावी अशी परमेश्वराची इच्छा आहे असें ह्मटले पाहिजे; आतां ज्ञान होते तहत् जर बुद्धीने दुर्विकाराच्या स्वाधीन होऊन ह्मणजे ज्ञानाची अवाज्ञा करून आचरण [ ह्मणजे क्रिया ] केले तर ज्ञानाच्या सल्ल्याने जो परिणाम व्हावयाचा त्याच्या उलट झाला पाहिजे.