पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३ प्रति बदला देण्यांत आपल्याच्याने हयगय झाल्यास स्वतः होउन आपणाप्त हलकें पडून घेण्याचा प्रसंग आणितों. २४ दुसऱ्यास जेवणास बोलावण्याच्या खर्चात यावे लागते. २५ दुसऱ्याची बरदास्त व व्यवस्था ठेवण्याचे श्रम ध्यावे लागतात. २६ दुसऱ्यास जेवणास बोलाविण्याच्या संबंधांमुळे कर्जबाजारी हो ण्यास किंवा स्वतः तंगी येण्यास आपण कारण होतॊ. २७ आपल्या आद्याकडे नजर न देतां दुसऱ्यास जेवणे दिली तर आपण तंगीत येऊन तेच लोक आपली निंदा करितात . २८ आपण कोणास जेवणास बोलावल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यांत येण्यास कारण होतो. २९ सारांश ह्या जगतात परस्पर व्यवहार कायम रहाण्याकरिता व लोभाची [प्रीतीची ] वृद्धि ह्मणजे ह्या क्षणभंगुर जीवनाचे सार्थक होण्यास्तव परस्पर भोजनास बोलाविणे व जाणे इत्यादि " आदरस्यप्रत्यादरम् " कायम ठेविले पाहिजे परंतु त्यांत नाकांतील नथीचे मोती गहाण ठेवून जावयास तुपाची वाटी वाढणे हे अखेरीस पश्चाताचे मूळ होय, . य कृति, कृत्य. १ कृति ह्मणजे कृत्य अथवा ज्याचा काही तरी परिणाम किंवा फळ उत्पन्न होईल असे आचरण किंवा वर्तन.