पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भोजना विषयी. (आदरस्य प्रत्यादरं.) भोजन ह्मणजे निदान वर्तमानकाळी तरी ज्या पासून तृप्ति होऊन, मनास संतोष झाल्याने अरसपरस पासून प्रीतीत ज्या पासून वृद्धि होईल असा प्रघात किंवा प्रचार. प्रघाताची मुख्य कारणे:-दळण वळण वाढणे, प्रीतीची व अगत्याची वृद्धि होणे. ३ कारणाच्या निमित्तांनी मिष्ट भोजन मिळणे. ४ आपल्या शक्तिप्रमाणे दुसऱ्यास संतोषित ठेवण्याचा उपाय.. ५ दुसऱ्याचे मन आपल्याकडे ओढून घेण्याची कला. कोणास अगत स्वागत दाखविण्याची निशाणी. खूण] उदारतेची कीर्ति मिळविण्याची रीति किंवा प्रसिद्धीस ये ण्याचा मार्ग. १ फायदे. दुसऱ्याच्या घरी भोजनास गेलों म्हणजे त्यापासून त्याचा आपला संबंध जास्त निकट होतो. २ दुसऱ्याच्या येथे जेवणास गेल्यामुळे त्याला आपल्या येथे यावे लागते. व आपले म्हणणे बहूत करून (योग्य) ऐकावे लागते. ३ मंडळीत कसें भोजन करावे किंवा मंडळीत कसे वागावे ह्याचे ज्ञान मिळते. ४ आयतें बिन श्रमानें मानाने अगत्य पूर्वक व ओशाळ पणा विरहित मिष्टान मिळतें.