पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५३ दुर्जन अल्पकाळ पर्यत आपल्या सुखरूपी जाळ्यांत मग्न असतो कारण त्याच्या दुष्कर्माच्या फळाची पूर्ण वृद्धेि झाल्या शिवाय संकट व नाश रुपी शिकारीस आपली शिकार साधल्याची खात्री होत नाही. दुर्जनावर संकट येतात त्यावेळेस हटकून त्याच्या नाश होण्यास वेळ लागत नाही कारण ती [ संकटें ] त्याच्या वाईट कर्मा पासून उपन्न झालेली आसतात. ७ दुर्जनाच्या पाठीमागें अपकीर्ति अक्षय उभी असते, कारण त्याच्या हातून दुसऱ्याच्या अकल्याणाचीच कामें होतात. र दुर्जना समोर सज्जन उघड रीतीने होत नाहीत कारण ते त्यां च्या दुर्गुणाचे किरण आपल्यावर न पडावे ह्मणुन फार जपतात. दर्जनाला संकट समयी कोणाची ही मदत मिळत नाही कारण तो जनाला आप्रिय असतो. १० दुर्जन सज्जनांना पाहून मनांत ओशाळतो व त्याची योगता ग्र हण करण्यास इच्छितो परंतु दुर्गुण टाकण्यास तो मात्र प्रयत्न करीत नाही. ह्या मुळे त्याची नीचांत गणना होते, तेव्हां तो अर्थात् सज्जनांची निंदा करलो ह्याने मात्र तो जास्त हलका पडतो व अक्षय दुःखांत असतो. आणि ह्याचा दोष दुसऱ्यांवर ठेवण्यास प्रयत्न करतो ह्यामूळे त्याला त्याची स्वतःचीच चूक लक्षात येत नाही.