पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुखी असते. आणि त्या नाशा पेक्षा त्यांना अक्षय कीर्तीचा मोठा लाभ प्राप्त होतो. सज्जनांच्यापाठीमागें कीर्ति अक्षय उभी असते कारण त्यांच्या हातून जनकल्याणाची कामें होतात. . सज्जनांसमोर दुर्जनाच्याने उघड रीतीने होऊ शकवत नाही कारण सज्जनांच्या कीर्ति समोर त्याच्याने टिकाव धर वत नाही. ८ सज्जनांना संकट समयीं सर्वाकडून मदत मिळते कारण तो जनाला प्रिय असतो. दुर्जन, दुर्जन ह्मणजे स्वकार्य बिघडूनही दुसऱ्यांस पीडा करण्याविषयी उत्सुक होणारा, दुःखिताला पाहून आनंद मानणारा, व सर्वांचा उगाच द्वेष करणारा. २ दर्जनाविषयी सर्वास तिरस्कार असतो कारण तो सर्वाचे अहितइच्छितो. ३ दुर्जनाच्या अंतःकरणात शांतता नसते कारण तो दुसऱ्याचे वाईट करण्याच्या खटपटीत अक्षय गुंतलेला असतो. ४ दुर्जन दुःखी असतो कारण त्याच्या अंतःकरणाला स्वस्थ ता नसते.