पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ आपल्या फायद्यांत किंवा बचावासंबंधी आपल्या मनासमान हितकर अशी दुसरी कोणाचाही सल्ला नाही. कारण आपणास प्रतिकूळ किंवा नडतर व अनुकूळ मार्ग व साधनें ही जितकी आपणास आपल्याबद्दल माहीत असतात तितकी दुसयस नसतात. सज्जन. १ सजन म्हणजे दुसऱ्याच्या अपराधाकडे लक्ष न देतां सर्वांचे हित इच्छिणारा, दुसऱ्याला संकटांत टांकून स्वकार्य ( साधण्यापासून ) दुर रहाणारा आपल्यामुळे दुसऱ्यास त्रास न पडेल ह्या विषयी काळजी बाळगणारा. सजनाविषयी सर्वांची पूज्य बुद्धि असते कारण त्याला कोणी दुखविलें तरी तो त्याचे हित करतो. सज्जनाचे अंतःकरण शांत असते कारण तो दुसऱ्याचें आहत करण्याच्या खटपटीपासून विमुक्त असतो. ४ सज्जन सुखी असतो कारण त्याचे अंतकरण शांत असते. ५ सज्जनांवर संकटें येतात कारण दुर्जनाला तो आड काठी असतो परंतु सज्जनांचा नाश होत नाही कारण जग व परमेश्वर त्याचा कैवारी असतात; कदाचित् मनुष्यनजरेनें त्याचा नाश झाला असे झाले तरी त्याचे अंतःकरण शांत व