पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४७ २० मूर्ख घरच्या कामाविषयीं निःष्काळजी असतो. कारण दुस याचा बोज आपल्यावर घेण्यास तो असमर्थ असतो ( आज्ञा ना मुळे ). २१ मूर्ख काम करण्यांत आळशी असतो. कारण त्याला दुसऱ्याच्या जिवावर मौजा मारण्यास लाज वाटत नाही. २२ मूर्ख अतिशय जागतो. कारण ख्यालीखुशालीमुळे त्याला आपल्या प्रकृतीविषयी काळजी रहात नाही. २३ मूर्ख अति झोंप घेतों कारण निरुद्योगामुळे तो वेळेची किंमत जाणत नाही. २४ मूर्ख दिर्घोटद्धपणाने वागतो. कारण आपल्या चुकीविषयी कोणी आपल्याशी कांहीं बोलूं नये असे त्याला वाटते. २५ मूर्ख हलक्या मनष्यावर प्रीति करितो. कारण त्याला वागण्यास चांगला मनुष्य मिळत नाही. २६ मूर्ख विद्वान व थोर लोकांशी बोलण्यासही मार्गे पाय घेतो. कारण अविद्या व लबाडमिळे लज्जा व भीति त्याच्या अंत:करणांत घर करून रहातात. २ देशाटन. देशाटन किंवा देशपर्यटन करणे ह्मणजे अल्प काळांत जास्त अनुभव किंवा माहीती करून घेण्याचा उपाय. देशाटन केल्याने चाणाक्ष अनुभवी व मिळणसार होतो.