पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ देशाटनाने मनुष्यास ह्या क्षणिक दुःखकारक मायेचे खरे स्वरूप कळतें. देशाटनाने दृढनिश्चय हिंमत ही मनुष्यांत वाढतात. देशाटनाने स्वतःच्या कामाबद्दल प्रयत्नाने बनेल तोपर्यंत दुसऱ्यावर अवलंबून न रहातां स्वतः कष्ट घेऊन पार पाडणे जास्त उत्तम, ह्या तत्वाचा मनुष्यांच्या मनावर ठसा बसतो. देशाटनांत मनुष्यांला नाना प्रकारच्या स्वभावाचे व जातीचे लोकांशी वागण्याचा, किंवा वर्तण्याचा प्रसंग येतो, त्या वेळेस नानात-हेच्या बोलण्याच्या, चालण्याच्या व वर्तण्याच्या कलांची त्याला प्रत्यक्ष माहिती होते, ह्या मुळे त्याला प्रसं गोपात योग्य रीतीचे वर्तन करण्यास त्याचे मन गोंधळून जात नाही किंवा तो भांबाऊन जात नाही. तेशाटनांत मनुष्यांस नाना प्रकारची जमीन, व वनस्पति, वस्तु, हुन्नर, कला, विद्या, भाषा, रीतमात, इत्यादिकांची माहिती होते, ह्यामुळे तो मनुष्य स्वजातीस व देशास एक उपयोगी रत्न होऊन पडतो. ८ देशाटनांत श्रम, थकवा, भूक, तान्ह, उन्ह, थंडी, अडचण व दुःखही सहन करावी लागतात. देशाटन करण्यास दृढनिश्चय व उमेदही दोन मुख्य साधने होत. घराकडची निष्काळजी, स्वजातीकडचा अडथळा नसणे, आणि स्वदेशाकडून आश्रय असणे, ही वरच्याहून उतरत्या प्रकारची साधनें होतयास्तव इतकी साधने असल्याशिवाय देशाटन होणे अशक्य आहे. व त्यांत दृढनिश्चय आणि उमेदही