पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ मूर्ख आबका पेक्षा जास्त खर्च करितो. कारण तो आ पल्या परिणामाचा विचार करूं शकत नाही. १२ मूर्खाला अति लोभ असतो. कारण संतोषाच्या सुखाचा त्याला अनुभव येत नाही. मूर्ख आपल्या शक्तीबाहेरची कामे करण्यास इच्छितो. कारण आपल्याच्याने ते होईल किंवा नाही ह्याचा तो विचार करित नाही. कारण की, तें कार्य करण्यांत काय काय अडचणी येतील त्या निवारणार्थ काय उपाय केले पाहिजेत हे ही त्याच्या लक्षात येऊ शकत नाही. १४ मूर्ख विनाकारण विरोध उत्पन्न करण्यांत हुशारी मानतो. कारण विरोधभावाचा परिणाम त्याच्या लक्षात येत नाही. १५ मुर्ख निर्बळास त्रास देण्यांत शौर्य मानतो. कारण आपल्या पराक्रमाचा उपयोग करण्यास त्याला दुसरी जागा नसते. १६ मूर्ख दुसऱ्याची हमेश निंदा करितो, कारण तो स्वतः कांहीं कार्य करूं शकत नाही. १७ मूर्ख वारंवार खोटे बोलतो. कारण त्याला आपली प्रतिष्टा मिरवीण्यास व अन्याय लपविण्यास दुसरा उपाय सुचत नाही. १८ मूर्ख विषयासक्त असतो. कारण इंद्रिये वश ठेविण्याची त्या च्यांत शक्ति नसते. १९ मूर्ख व्यसनाधीन असतो. कारण ह्या पराधीनपणाला तो ख्यालीखुशाली ( आनंद ) समजतो.