पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४५ मूर्ख. १ मूर्ख गर्वाने वागतो. कारण तो स्वतःचें ज्ञान पूर्ण समजतो. २ मूर्ख दुर्वचनें बोलतो. कारण तो आपली चूक न सुधारतां दु सयस दोष देण्यास तयार असतो. ३ मूर्ख अतिशय बोलतो. कारण आपल्या बोलण्याच्या परिणा माचा तो विचार करित नाही. ४ मूर्ख अतिक्रोधी असतो. कारण तो सत्यासत्य ओळखं श कत नाही. ५ मूर्ख उपकारावर अपकार करितो कारण तो उपकार सम जू शकत नाही. मूर्ख उद्धटपणाने वागतो. कारण बेपर्वाइनें वागण्यांत तो मोठेपणा समजतो. मर्ख स्वकीयजनांशी वैर करितो. कारण त्याला स्वतःचें कल्याण अकल्याणी कळत नाही. ८ मुर्ख स्वतःचीच स्तुति ऐकण्याची इच्छा ठेवितो. कारण ज्ञान संपादन करण्याची त्याला पर्वा नसते. मुर्ख स्वतःची स्तुति करितो. कारण त्याच्या चुका त्या च्या लक्षात येत नाहीत. १० मूर्ख दुसऱ्याला हलके मानितो. कारण गर्वामुळे त्याच्या ज्ञान चक्षूला उघडण्यासही वेळ सांपडत नाही.