पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ विद्वान् योग्यदान करण्यांत उदार असतो द्रव्याचा उपयोग काय, हे जाणतो. २३ विद्वान् परदुःख निवारण करण्यांत उल्हास मानिता कारण दुसऱ्याचे दुःखाकडे त्याचे अंतःकरण कोमळ असते. २४ विद्वान् दुसऱ्याची योग्यस्तुति करितो कारण दुसऱ्याच्या कीर्तीची त्याला ईर्षा येत नाही. २५ विद्वान् इंद्रियदमन करण्यांत सामर्थ्यवान असतो कारण इंद्रि ये वशठेविण्यांत तो पराक्रम जाणतो. २६ विद्वान् व्यसनापासून दूर रहातो. कारण तो व्यसनाला, आपणाला दास करून टाकणारा शत्रु समजतो. २७ विद्वान थोडे बोलतो. कारण आपल्या शब्दाचा तोल व परिणाम ह्याचा तो अगोदर विचार करितो. २८ विद्वान मंद ( थोडे ) हांसतो. कारण ज्ञानामुळे त्याला आ श्चर्य वाटण्या सारख्या गोष्टी थोड्या असतात. २९ विद्वान निर्मळ राहतो कारण योग्य कामाशिवाय तो अमं गळ (अशौच) पर्दाथाला शिवत नाही. ३० विद्वान थोर व वृद्ध यांच्या जवळ नियमाने वागतो कारण तो दुसन्याचा अपमान करून आपला हलकटपणा व अल्प विचार बाहेर प्रकाशित करण्यास धजत नाही.