पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ विद्वान परजनांवर दया ठेवितो. कारण तो दुसऱ्यांला दुःख देण्यास इच्छित नाही. १३ विद्वान, मूर्खावर कडकपणा ठेवितो. कारण तो त्याला स्थितीवर आणण्यास इच्छितो. १४ विद्वान सज्जनावर प्रीति ठेवितो कारण तो सज्जनाचे कल्याण इच्छितो. १५ विद्वान दुर्जनाशी गर्व ठेवितो कारण तो त्याचा तिरस्कार करितो. १६ विद्वान विद्वानाजवळ सरळपणा ठवितो कारण त्याला त्रास न व्हावा ह्याविषयी त्याला काळजी असते. १७ विद्वान शत्रुविषयी शूर [ धैर्य ] पणा ठेवितो. कारण तो त्याला भिऊन उगाच न रहातां स्वरक्षणार्थ उपाय योजितो. १८ विद्वान् गुरूच्या ठिकाणी सहनशीलता ठेवितो. कारण तो जाणतो की ते आपले हित करणारे आहेत ह्मणून तो त्यांना त्रास किंवा दुःख न देतां विद्या प्राप्त करून घेतो. १९ विद्वान् स्त्रांचेठायीं चपल (हुशार ) रहातो कारण तो तिच्या मोहपाशांत न फसतां तीचे कावे ओळखू शकतो. विद्वान् निर्बळाला क्षमा करितो कारण निर्बळाला पीडा कर ण्यांत तो हलकेपणा समजतो. २१ विद्वान् स्वधर्मच्याठायों स्थीर असतो. कारण त्याचे मन ज्ञाना मुळे अंधकारांत गोते खाऊन फसत नाही. [ तक्रार करून ]