Jump to content

पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तल्यावांचून राहणार नाहीत.नाही तर निदान निंदातरि करित फीरतील. पापा मनुष्याचा सर्व लोक तिरस्कार करतात त्याच्या कामांत कोणी मदत करीत नाही त्याचे सर्व अकल्याण इच्छितात. १ पुण्य म्हणजे दुसऱ्याला सुख देणे. २ दुसऱ्याला ज्या कामांत सुख होईल त्या कामांत आड येऊ नये. ३. दुसऱ्याला सुख देणे हा मनुष्याजा धर्म आहे. ४ दुसऱ्याला सुख देणारा मनुष्य सर्वकाळ आनंदांत असतो. ५ सज्जन मनुष्य दुसऱ्याला सुख देण्यांत हर्ष मानितो. दुसऱ्याचे हीत इच्छणारा विषयी सर्वाची पूज्यबुद्धि असते. ७ पुण्यवानाच्या सर्व कामांत लोक त्याची स्तुती करून त्याला मोठ्या खुशीने मदत करतात. पुण्यवानापासून शोक व पश्चात्ताप दूर रहातो. आपल्या सारखे दुसऱ्याचे सुख दुःख जाणणे या सारिखा साधुपणा नाही.