पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हर्ष म्हणजे आनंद किंवा सुखाचे अश्रु होय. २ हर्षा बरोबर काही तरी शोक असतो. ३ हर्षा मध्ये मदोन्मत्त होऊं नये. वाईट किंवा अयोग्य कामांत हर्ष मानूं नये. वाईट कर्मानें हर्ष प्राप्त होतो, परंतु पुढे दुःखाची वाटणी येते चांगल्या कामांत हर्ष मानावा. ७ हर्षात दुसऱ्या विषयी बेपर्वा करूं नये. ८ हर्षात कोणाची निंदा करूं नये. ९ हर्षा मध्ये कोणाचा अपमान करूं नये. १० परोपकाराचा हर्ष अखेरीस पश्चात्ताप देत नाही (म्हणजे शेवट पर्यंत सारखा रहातो). धर्म. १ धर्म म्हणजे फर्ज किंवा कर्तव्य कर्म. २ मनुष्याला शांततेत राहण्यासाठी धर्माने वागले पाहिजे. ३ आपल्या सारखे दुसऱ्यास मानणे हा मनुष्याचा पहिला ध म होय. ४ मनुष्याचे मुख्य दहा प्रकारचे धर्म आहेत - दया, क्षमा, शांति, धैर्य, दमन, सत्य, ज्ञान, नम्रता, उपकार, मर्यादा,