पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वस्त्र धारण केल्याने आपली तबीयत बिडघते, दुसरें लोक (आपणा पासून) दूर राहण्याची इच्छा करितात ह्मणजे आपले वजन त्यांच्यावर पडतनाही. जो अंगावरील कपडे स्वच्छ ठेवितो त्याचें घरही स्वच्छ रहाते, कारण त्याला मग आपल्या घरांतीलही घाण किंवा कचरा आवडत नाही त्यामुळे जन जनावराकडचेही भय नाहींसें होते. निर्मळ मनुष्याच्या अंगी सर्व कामें स्वच्छकरण्याची हौस असल्यामुळे त्याला ती काळजी पूर्वक करावी लागतात त्यामुळे त्याची कोणत्याही कामांत चूक पडत नाही. हत्या . हत्या करणे झणजे वध किंवा खून करणे किंवा जीव घेणे. २ लहान जीवाचीही हत्या करूं नये. ३. वध किंवा खून करण्यास बहूतकरून क्रोध ममत (अभिमान) दुष्कृत्याचाबचाव ही करणे असतात. १ आपल्या शत्रुचाही आपण जीवघेण्याचा प्रयत्न करूनये कारण जीव घेतल्याने आपण त्याला सर्व दुःखांतून आपल्या शिरावर घेउन मोकळा करितो व दुसरें त्यच्या बदल्यांत आपण पश्चाताप व भय मात्र उत्पन्न करून घेतो. ५ हा किंवा खून मात्र निर्दय मनुष्याच्या हातून होऊ शकतो.