पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ दुःख पश्चातापांतून उप्तन्नहोते. ४ गर्वापासून पश्चाताप होतो. ५ ज्ञान किंवा विचार नाहीसा झाल्याने दुःख दुणावतें. सुज्ञ मनुष्य चुक किंवा वाईट परिणामाबद्दल दुःख न करतां निवारणार्थ शांततेने व विचाराने उपाय करतो. कोणतेही दुःख आपणास झाले तर अगोदर ते आपल्या कोणत्या चुकीमुळे झाले हे शोधून काढावे व ती चूकी कशी सधारले याची योजना करून दुःखाचे मुळ नाहींसें करावें. ८ दुख केल्याने आपले मन शांततेपासून दूर रहातें या म आपण गोंधळून जातो व ह्या कारणाने आपण कोणतेही कार्य करूंशकतनाही व कार्य झाल्याशिवाय यशप्रापि होत नाही. आणि यश किंवा कीर्ति प्राप्तझाल्याशिवाय धन प्राप्त कसे होईल. आणि धन किंवा पैसा न मिळाल्याने मात्र निर्वाहाची काळजी उत्पन्न होते. स्वच्छता. स्वच्छता ह्मणजे निर्मळपणा... ज्याला आरोग्य राखण्याची इच्छा असेल त्याने स्वच्छता ठेविली पाहिजे. ३ हलके कपडेही धुऊन ठेवण्याने शोभा देतात. ४ अमंगळपणाने किंवा कळकटपणाने राहिल्याने अथवा मळकट