पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ ८ धैर्य सोडल्याने मनुष्याचा लोकांत बोज रहात नाही. ९ धैर्य ठेविल्याशिवाय साझ मिळतनाही. न्याय १ न्याय झणजे योग्यायोग्याचा विचार करून योग्य दिसेल ते करणे. न्यायी पुरुषाच्या हातून सहसा अन्याय घडतनाही. ३ प्रामाणिक मनुष्य मात्र न्यायि या मानास योग्य आहे; कारण तो अयोग्य कर्माप्त कधी सामील होत नाही परंतु तें तो उलटे उघडकीस आणतो व त्याच्याहातून लोभाने किंवा शिफार सीने पक्षपात होतनाही. ४ न्यायी मनुष्य जगताला पुष्कळ उपयोगी आहेत. ५ न्याय करणाऱ्या पुरुषाच्या प्रामाणिकपणावर सर्व लोकांचे सुख अवलंबून असते. न्याय करणाऱ्या मनुष्याने मनांत खूब समजले पाहिजे की गुन्हेगारावर वैर घेण्याकरितां त्यास शिक्षा करावयाची नाही परंतु त्याचे हातून असागुन्हा पुनः होऊनये किंवा दुसन्याला तसा गुन्हा करणाऱ्यास उत्तेजन मिळूनये हाच हेतु आहे. तर शिक्षेशिवाय वरील योजना जो पर्यंत पार पडेल तों पर्यंत प्रयत्न करावा.