पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उदारपणा हा योग्य पात्र पाहून करावा की, त्यापासून आपले व ज्याच्यावर आपण उदार होऊं त्याचे व देशाचेही कल्याण होईल. उदारतेचा वाईट उपयोग केल्याने आपले व ज्याच्यावर आपण उपकार केला असेल त्याचे व जातीचे आणि देशाचंही नुकसान होते; जसें, एक दारूबाजाजवळ पैसे नसल्यामुळे तो रडत किंवा शोक करित अथवा संतापत बसलाआहे. आणि आपण दयेने उदार होऊन त्याला पैसे दिले, तर तो जास्त दारूबाज होणार! अर्थात् तो वाईट स्थितीपासून सुटणार नाही हे त्याला नुकसान व आपणासही पैशाचे नुकसान, व एक मनुष्य व्यसनी जास्त झाला हे ज्ञातीला किंवा देशाला नुकसान नव्हे काय? धैर्य १ धैर्य ह्या शद्वाचा अर्थ हिंमत किंवा मनाची स्थीरता. २ धैर्यवानाजवळ दुःख बहुतकरून येतनाही. ३ धैर्याशिवाय कोणत्याही कार्याचा आरंभ होत नाही. ४ धैर्य हे सर्व शास्त्रांत श्रेष्ट होय. धैर्याशिवाय मनुष्य आपले संरक्षण करू शकत नाही. ६ धैर्य हे मनुष्य पदवीलायेण्याची पहिली पायरी होय. धैर्य सोडल्याने मनुष्याच्याने काही पराक्रमाचे कृत्य होऊ शकतनाही.