पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३२) करितो, तो एकाद्या वेळेस अगदी अवश्य वस्तूसाठी देखील अडून बसतो. ७ अयोग्य खर्च केल्याने एक आपणास पैशाची नुकसानी दुसरे लोक आपल्याला हसतात. कार्यात देखील आपल्या योग्यतेपेक्षा जास्त खर्च करूं नये. कारण जे लोक आपल्या-येथे यथेष्ट हात मारून जातात तेच आपण कर्जाच्या संकटांत आल्यावर आपल्या फजीतीचे व मूर्खपणाचे पोवाडे गात फिरतात. ९ अवश्य खोराकी व पोशाकाच्या खर्चाकडे वाईट नजर करूं नये. १० विचाराने खर्च केला तर मनुष्य कर्जबाजारी न होता दोन पैसे बाळगून असतो, त्यामुळे तो आपले मागले दिवस अपमानाशिवाय सुखात घालवितो. औदार्य. १ औदार्य ह्मणजे दातृत्व, मोठे मन, किंवा दान शक्ति. २ मनुष्य विद्वान् मेहेनतीने होऊ शकतो, परंतु उदार होणे परमे श्वराचीच देणगी होय. एक उदारता सर्व अवगुणास झाकण्यास समर्थ आहे. ४ सत्ताधीशांपेक्षां उदारांची नांवें लवकर प्रसिद्ध होतात. उदारपणा हा मनुष्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे करावा; कारण अति उदारतेमुळे बळी राजास पाताळी जावे लागले.