पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

र उदार ७ कृपणाच्या हातून परोपकार किंवा दुसऱ्याचे दुःख निवारण होत नाही. उदार मनुष्य संपत्तीला आपली दासी करितो, परंतु कृपण आपण तिचे दास्यत्व कबूल करून आपणांस चिरकाल पर्यंत त्रासांत पाडून घेतो. कृपणाचें मनांत दुसऱ्याचे दुःख पाहून कधी ही दया उप्तन्न होत नाही, म्हणजे कृपणता त्याच्या मनांत दयेला उप्तन्न होऊ देत नाही. कृपणता व लोभ मामध्थें अंतर हेच की, लोभांत मिळविण्यांत मनाची खोटी हाव व खर्चण्यांत कोतेपणा, कृपणतेंत फक्त खर्चण्यांत कोतेपणा असतो. व्यय. १ व्यय म्हणजे खर्चणे किंवा उपयोग करणे. २ मिळविण्यापेक्षां खर्च करण्यांत जास्त शहाणपणा आहे. ३ मनुष्याला दैवयोगानें धन मिळू शकते, परंतु योग्य व्यय दैवयोगानें करितां येत नाही. खर्च करणे तो आपली प्राप्ती पाहून करावा. ५ शास्त्राप्रमाणे आपल्या प्राप्तीचा एक तृतियांश, खर्च आता शिलक राहिली पाहिजे. ६ जो मनुष्य ख्यालीखुशालीच्या वस्तु घेण्यांत पैसा खर्च