पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२८) र घातकी पुरूषाला कुन्हाडीच्या दांड्याची उपमा देतात, पण कुन्हाडीचा दांडा दुसऱ्याच्या कारणाने गोतास काळ होतो; परंतु घातकी पुरूष आपणच होऊन आपल्या कुळास, जातीस किंवा देशास घातकी होतो! तेव्हां जड जो कुन्हाडीचा दांडा त्याच्यापेक्षाही हा नीच नाही काय? विश्वासघातकी सर्पापेक्षां वाईट नव्हे काय ? कारण सर्प एकच मनुष्याचा नाश करितो, दुर्जन ह्मणजे विश्वासघातकी बुद्धिपूर्वक सर्व देशाचा नाश करावयास भीत नाही. १० घातकी ह्मणविण्यापेक्षां निर्धन ह्मणविणे फार वरें, किंवा बुद्धि हीन पदवी फार चांगली आहे. कारण बुद्धीचा किंवा धनाचा वाईट उपयोग केल्याचा दोष येत नाही. व्यवस्था. व्यवस्था म्हणजे कोणत्याही कामाचा किंवा खर्चाचा (नियमितपणा ) ठेवणे. व्यवस्थेशिवाय कोणतें ही काम कसे होईल ? कारण, त्या कामाचा परिणाम काय, व ते आपण करूं शकू किंवा कसे, व करूं शकू तर कशा रीतीने, आणि ते करण्यांत कोणकोणत्या अडचणी येतील,व आपण त्या कशारीतीने निवारण करूं शकू ह्या सर्वाचा मनांत विचार करून मग त्याची व्यवस्था लाविल्याशिवाय कामांत साफल्यता मिळणार नाही. ३ व्यवस्थेशिवाय मन गोंधळून जातें.