पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२९) कामाच्या व्यवस्थेनें मेहनतीचा व वेळेचा बचाव होतो. ५ खर्चाच्या व्यवस्थेनें यश येऊन खर्चाचा बचाव होतो. ६ व्यवस्थेनें आपणांस त्या कामाचे किंवा खर्चाचे अगोदर ज्ञान होते, यामुळे आपले मन अंधारांत राहून ठोकरा खात नाहीं किंवा पश्चात्ताप पावत नाही. व्यवस्थेनें पुष्कळ कामे करण्यास आपण शक्तिमान होतो. आणि आपल्या मनाची स्थीरता व शांतता राहते. संसारिक आबादी वाढते व भापल्याला ज्ञान संपादन करण्यास पुष्कळ मदत मिळते. दर्द किंवा दुखणे. १ दर्द किंवा दुखणे झणजे आपल्या प्रकृतीला किंवा शरीराला अस्वस्थता वाटणे. २ दुखणे होण्यास बहुतकरून मनुष्य स्वतःच कारणी असतो ३ दुखणे आले ह्मणजे आरोग्यतेची किंमत समजते. ४ दुखण्याने मनुष्य पथ्याची खुबी जाणतो. ६ दखणें मनुष्यास अभिमान सोडून सन्मार्गाने चालविण्यास एक शिक्षक आहे. ६ दुखण्यांत मनुष्य सहनशीलतेने किती सुखमिळते हे समजूशकतो. ७ दुखण्याचे मूळ कारण आरोग्यतेविषयी निष्काळजीने राहा णे हे होय.