पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२७) ७ स्वपरीक्षेने अभिमान किंवा गर्व आपोआप नाहीसा होतो. ८ स्वपरीक्षेनें मनुष्याचें मन अंधारांतून म्हणजे गुचवीतून उजेडांतर येते. विश्वासघात. विश्वासघात ह्मणजे कोणाला भरंवसा किंवा विश्वास देऊन फसविणे. २ विश्वासघातासारिखें दुसरें घोर कर्म नाही. मांगापेक्षाही वि श्वासघातकी फार वाईट आहेत. चोरापेक्षाही विश्वासघातकी दर्जन होय. कारण मांग उघड कर्म करणारा आहे. चोर आपल्या गाफिलीचा उपयोग करतो परंतु विश्वासघातकी आपणास गाफिलीत टाकून त्याचा लाभ घेतो, व सुजनामध्ये आपली गणना करविण्यास प्रयत्न करितो. विश्वासघाताने आपली अब्रू, वजन किंवा भरंवसा रहात नाही. ४ एक विश्वासघातकी सर्व देशाला दुःखांत टाकण्याला कारण होतो. देशाची किंवा कुळाची नाश होण्याची वेळ आली ह्मणजे घातकी पुरूष उप्तन्न होतात, व त्यांचे हाती सत्ता येते. घातकी पुरूष आपण अपयशांत मरून जातो; परंतु आपल्या कुळाला व देशाला पश्चात्तापासहीत कष्टांत व शरमेत दुसरा लौकिकवान पुरूष उप्तन्न होईपर्यंत ठेवून जातो. घातकी मनुष्य आपल्या कुटुंबापासूनही मान किंवा प्रीति मिळवू शकत नाही, ह्यामुळे त्याला संताप. व शोक उप्तन्न होतो.