पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपण चाकर ह्मणजे दास. दुसरें स्वामिभक्तीकरितां आपणास सर्व धर्म टाकले पाहिजेत. स्वाभिक्तीसाठी आपण आपला मोठेपणा सोडिला पाहिजे. ४ स्वाभिद्रोह ह्मणजे घात किंवा शुद्ध दगलबाजी होय. कारण आपल्यावरच्या विश्वासाचा आपपण वाईट रीतीने उपयोग केल्याशिवाय द्रोह होत नाही. ५ स्वामीचे कल्याण तेच आपले कल्याण समजले पाहिजे. स्वपरीक्षा. १ स्वपरीक्षा ह्मणजे आत्मज्ञान. ह्याचा अर्थ आपली योग्यता, स्थिति, परिणाम व उपाय हे समजणे. स्वपरीक्षा ही विवेकानें सचोटीने केली पाहिजे. ३ स्वपरीक्षेशिवाय आपल्यामध्ये काय अवगुण आहेत ते कळत नाहीत. ४ जो स्वपरीक्षा करूं शकत नाही, तो दुसऱ्याची परीक्षा कर ण्यास नालायक आहे. ५ स्वपरक्षेिमुळे आपली योग्यता कळून येते, म्हणजे त्याप्रमा. में वर्तण्यास ठीक पडते. स्वपरीक्षेमुळे आपल्या ज्या ज्या चुका उघडकीस येतील, त्या त्या सुधारण्यास मजबूत कांही तरी ठराव करून ( योग्य वाटेल) त्याप्रमाणे वागले पाहिजे.