पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मामुळे आपले काय नुकसान होते किंवा होईल तेही शोधावें. मग विवेकाने त्या खाम्या सुधारण्याविषयी धिमेपणाने व विचाराने योजना करावी. दुसऱ्याने सांगितल्यावरून किंवा शरमेने आपल्या रीतीभातीत सुधारणेच्या परिणामाचा विचार केल्याशिवाय फरक किंवा बदल करूं नये. परंतु आपल्या स्वतःच्या ज्या खोडो किंवा चुका आपणास वाटतील, किंवा दुसरा कोणी सुचवील तर त्याजवर मनन करून त्या ताबडतोब सुधारण्याची योजना करावी. ७ जी जी सुधारणा आपण करूं त्यापासून आपणास तोटा, दुः ख, हीनत्व येईल किंवा आपल्या स्वतंत्रतेस अगर अब्रस धक्का बसेल असें मात्र होऊ नये. सुधारणा मनुष्याने अवश्य करण्याचा प्रयत्न करावा. कारण आपली बुद्धि व चालचलणूक ह्यांत सुधारणा झाल्याशिवाय आपली योग्यता वाढत नाही. विवेक. १ विवेक ह्मणजे मर्यादा ह्या दोन शब्दाचा अर्थ आपल्या व दुस ज्याच्या योग्यतेची सचोटीने परीक्षा करणे व त्याप्रमाणे दुसज्याशी वर्तणे. अविवेकी मनुष्य अज्ञान आहे. कारण तो एक आपल्यालाही ओळखल्याशिवाय आपल्याविषयी मोठे मत बांधितो.