पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ ११ धनवानाला लोक वारंवार फसवितात परंतु विद्वानाला तसे होत नाही. १२ धनवान् आपले काम स्वतंत्रपणे करूं शकत नाही, परंतु विद्वान ते करूं शकतो. १३ धनवान् आपली चूक कबूल न करितां दुसऱ्याचा दोष काढतो ( बहुत करून ), पण विद्वान दुसन्याची चूक पाहून आपण सुधारतो. १४ विद्या शिकते वेळेस कंटाळा, त्रास, व दुःख होते, परंतु ती प्राप्त झाल्या वर त्यांच्या पेक्षां सहस्त्रपट आनंद होतो. १५ विद्येची इच्छा करणे परंतु ती प्राप्त होण्यास श्रम न करणे हे अविद्वानाचे पहीलें लक्षण होय. १६ विद्या ही जातीवर किंवा रूपावर मुलणारी नाही. कारण नजर करा. एक कावळ्याचा माळा त्याने तृणाचा केला आहे परंतु कितीही तुफान झाले तर झाड पडते परंतु तो त्या पासून निराळा होत नाही, किंवा त्यांत पवन अथवा पाणी शिरूं शकत नाही; आणि मोठमोठाले इंजिनीयर राक्षसी कदाच्या दगडाच्या ज्या इमारती बांधतात त्या पृथ्वी कायम अ सताही पडतात तेव्हां विद्येचा अभिमान चालेल काय ? १७ विद्या ही कूरूपाला रूप देते, मूर्खाला ज्ञान आणते, धनवाना ला सन्मानास योग्य करते, दरिद्याला धन किंवा सख देते; तर विद्या प्राप्त करून घेण्याला साधन असतां जो आळसः करितो त्याला काय ह्मणावे ?