पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ विद्या मनुष्याने अवश्य संपादन करावी. ३ विद्ये विषयी अभिमान धरूं नये. ४ विद्वानाची खूण नम्रता आहे. ५ वाचणे व लिहीणे हे दुसऱ्या मनुष्याच्या मनांतील उद्देश खूर्णा नी समजण्याची किंवा समजावण्याची विद्या होय. ६ विद्या ही उद्योग किंवा श्रमाशिवाय प्राप्त होत नाही. विद्या न होण्यास मुख्य कारण आऊस किंवा कंटाळा आहे. ८ विद्येशिवाय मनुष्य आपल्याला ही ओळखू शकत नाही. ९ विद्वानमनुष्याची योग्यता धनवाना पेक्षा जास्त कां न मानावी बरें ? कारण एक तर धनवानाची दौलत त्याच्या खुशीशिवाय दसरा घेऊ शकतो, परंतु विद्वानाचे विद्याधन त्याच्या खशी शिवाय कोणी घेऊ शकेल काय ? धनवान् आपल्या आश्रित व खुशामती लोकांपासून मान पावतो; परंतु विद्वान सर्व देशांत मान पावतो, धनवान् आपल्या धनानें कोणाला काही काळ पर्यंत सुख देतो; परंतु विद्वान ज्याला आपली विद्या देतो त्याला जन्माचा सुखी करतो. धनवानाला दुसऱ्याचे कल्याण करण्यास आपल्या द्रव्याची हानी सोसावी लागते, परंतु विद्वानाला दुसऱ्याचे कल्याण करण्यांत आपल्या विधेची वृद्धि होते, यास्तव धनवानापेक्षा विद्वानाच्या हातून दसऱ्याचं कल्याण वारंवार होते ह्या करणांनी धनवानापेक्षा विद्वानाचा देशाला जास्त उपयोग होतो. १० धनवान् दैवयोगाने होऊ शकतो परंतु विद्वान उद्योगावां चन होऊ शकत नाही.