पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ स्वदेशाचे कल्याण हेच आपल्या सुखास कारण आहे. ६ स्वदेशाभिमानी हा मान, तन, मन, धन, आणि बुद्धीने खप णाराशिवाय दुसऱ्याला मिळत नाही. ७ धार्मिक मनुष्य आपल्या उदार धर्मकृत्यांनी कित्येक लोकांना कांही दिवस सुख देतो. परंतु स्वदेशाभिमानी आपल्या पाठीमागेही स्वदेशाला सुख ठेऊन जातो. स्वदेशाभिमानी पुरुषाने ध्यानात ठेवावे की, आपल्या देशाचे कल्याण होण्याची इच्छा असावी, परंतु त्या बरोबर दुसऱ्याचे वाईट करण्याची किंवा दुसऱ्यास दास्यत्वास आणण्याची इच्छा नसावी. स्वदेशाभिमानी मनुष्य लोभाने लालचत नाही, भयाने भीत नाही, धास्तीने हटत नाही, निराशेनें कंटाळत नाही, मेहनतीला त्रासत नाही, आळसा पासून दूर रहातो, आपसांतल्या मांडणासाठी तिसऱ्या जवळ न्याय मागण्यात जात नाही, येवढी लक्षणे ज्यांत असतील त्याच्या हातून खरोखर देशकल्याणाचे काम पार पडेल. स्वदेश कल्याण न इच्छिणारा मनुष्य राजद्रोहा पेक्षा जास्त गुन्ह्यास पात्र आहे, कारण राजद्रोह करणारा मनुष्य एका मनुष्याचा किंवा काही मंडळीचा द्वेश करणारा होय; परंतु देशद्रोह करणारा त्या मंडळी पेक्षां हजारों किंवा लाखों पट मनुष्याचा द्रोह करणारा नव्हेकाय ? विद्या. १ विद्या ह्मणजे जाणणे किंवा ज्ञान करून घेणे.