पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ कोणत्याही कामांत आपणास त्रास वाटल्यावरून आपण आ शा सोडली तर मात्र आपली नाउमेद आणि अधैर्यता दृष्टोप्तत्तीस येते; परंतु जर आपण काळजी पूर्वक त्या कामाच्या पाठीमागे लागलों, तर सर्व अडचणीचे आपण निवारण करून कर्तीिस चढतो. आपल्या मनांत ज्या ज्या इच्छा उप्तन्न होतील, त्या त्या विवेकबुद्धीने प्रथम तपासून पहाव्या; आणि ज्या ज्या इच्छा आपणास अशक्य किंवा अयोग्य वाटतील त्या त्या ताबडतोब सोडून घ्याव्या. असे केल्याने आपण आपल्या कामांत साफल्य अवश्य पावू. स्वदेशाभिमान. १ स्वदेशाभिमान ह्मणजे स्वतःचे वंशाचे, व स्वज्ञातीचे आणि स्वदेशाचे कल्याण होण्याचा मार्ग ज्या देशाच्या कल्याणावर आहे, त्या देशाच्या हिताविषयी अभिमान असणे. '. ज्या देशांत स्वदेशाभिमानी पुरुष उत्पन्न होतात त्याच देशाचा उत्कर्ष होतो. स्वदेशाभिमानाला अशक्य व अयोग्य स्वकल्याणाची (ह्मणजे खरें पहाल तर स्वकुळाचा क्षय करण्याचे । बुद्धीची इच्छा हाच मोठा अडथळा आहे. ४ स्वदेशाभिमानी पुरुषांचा मुख्य हेतु आपल्या देशावर उपकार करण्याचा होय.