पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ दया मनुष्याच्या मनांतून नाहीशी झाल्यावर बाकी घातकी पणा आणि जुलमाशिवाय कायराहील? ८ भयाने दुसऱ्याला दुःख न देणारापेक्षां दयेने दुसऱ्याला न दुःखविणारा श्रेष्ट होय. ९ गुप्त घातकी कामाला अटकवणार दयेशिवाय कोण आहे? १० दया ही अनाथासाठी परमेश्वराने उप्तन्न केली आहे, व तिचा उपयोग अनाथाला योग्यरीतीने द्यावा, अनाथाची गणना बहुतकरून खाली लिहील्याप्रमाणे आहे. बाप नसलेला लहान मुलगा, विधवा, रोगी, व्यंग, दुसऱ्याच्या कारस्थानांनी संकटांत आलेला, किंवा दैवयोगानें ज्याच्या स्थितीत फरक पडलेला मूर्ख. ११ मूर्खावर दया करणे ह्मणजे त्याला सुधारण्याचा उपाय करणे. आशा. - - - १ आशा ह्या शब्दाचा अर्थ उमेद किंवा काही अंशी खात्री असा होतो. २ सूज्ञ मनुष्य शक्य व चांगल्या कामांतच आशा करितात. कारण ते कार्य आपल्या हातून पार पडून त्यापासून आपणास सुखहोईल किंवा नाही ह्याचा ते आगोदर विचार करितात. आशा सोडिल्याने आपण कोणतेही कार्य सिद्धीस नेऊं शकत नाही.